प्रतिष्ठा न्यूज

दरेगावात जन्म घेतलेल्या ज्ञानदीपाची दीपावलीच अनुकरण समाजाने करावे : माजी सनदी अधिकारी- एकनाथ मोरे यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा :- एखादा उपक्रम सतत अंमलबजावणी केल्यामुळे त्यागाव, संस्था आणि व्यक्तीची ओळख निर्माण होते. दरेगावची ओळख ज्ञानदीपाची दीपावली साजरी करणारे दरेगाव अशी होत,हे ज्ञानदीपाची ह्या अभिनव कार्यक्रमाचे यश आहे. ज्ञानामुळे समाजाचा कायापालट होण्यास मदत होते. त्यामुळे ज्ञानकेंद्रित उपक्रम राबविण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे दरेगावची ओळख ज्ञानदीपाची दीपावली साजरे करणारे दरेगाव अशी होत आहे.दरेगावात जन्म घेतलेल्या ज्ञानदीपाची दीपावलीचे अनुकरण समाजाने करावे असे आवाहन माजी सनदी अधिकारी तथा लक्ष्यवेधचे फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले.
नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील भूमीपूत्र डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या संकल्पनेतून गेल्या 25 वर्षांपासून ज्ञानदीपांची दीपावली हा नाविण्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केला जातो. त्या उपक्रमाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या अध्यक्ष पदावरून मोरे बोलत होते.
विचारपीठावर स्वागताध्यक्ष म्हणून- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव- प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, शिक्षण क्रांती अभियानाचे प्रणेते तथा आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख- दीपक कदम, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य- पांडुरंगराव पावडे, लेखक- डॉ.यशवंत चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक- शिवा कांबळे, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक- पंडित पवळे, मारोतीराव शिंदे, जलतज्ज्ञ तथा नागदरवाडीचा कायापालट घडवून आणणारे- बाबुराव केंद्रे, पी.बी वाघमारे, डॉ.शिवाजी कागडे, डॉ.केशव पाटील, शिवराज वडजे, सुभाष शिंदे, माधवराव भालेराव, मारोती शिंदे, संतराम रामशेटवार, डॉ.साईनाथ शेट्टोड, उत्तम गवाले, सुभाष शिंदे, साहेबराव शिंदे, सदाशिव हाम्पले, राष्ट्रपाल चावरे, बाळू पाटील, मोहनराव पवार, विजय मंदावाड, मुख्याध्यापक- अविनाश बामणे, शिवाजी लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना  एकनाथ मोरे म्हणाले, उपक्रमशील व्यक्तिमत्त्व हनुमंत भोपाळे हे स्वखर्चातून 25 वर्षांपासून ज्ञानदीपाची दीपावली ह्या प्रबोधनात्मक उपक्रमाची अंमलबजावणी करत आहेत. हा उपक्रम समाजाला विधायक दिशा देणारा आहे असे ते म्हणाले.
भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात पहिल्या दिवसी दि.12 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी- 7 वाजता गाडगेबाबांचा वेश परिधान करून ज्येष्ठ शाहीर तथा कीर्तनकार- दुगू तुमवाड यांनी प्रबोधनात्मक किर्तन सादर केले तर दुस-या दिवशी राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार सोहळा, व्याख्यान, गुणवंत व सामाजिक योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि बाल मेळावा घेण्यात आला.
यावेळी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख- दीपक कदम यांना राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख 5 हजार रूपये, मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी बाबुराव केंद्रे, उद्धव पाटील बैस, कोंडिबा बुरपले, डॉ.यशवंत चव्हाण, बाबाराव शिंदे, पंडित पवळे, शिवा कांबळे, डॉ.केशव पाटील, भा.ग. मोरे, संगमेश्वर लांडगे, शिवराज वडजे, रमेश पवार, पी.बी. वाघमारे, अविनाश बामणे, डॉ.वैजनाथ हंगरगे यांना शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख- दीपक कदम यांनी ज्ञानदीपाची दीपावली हा उपक्रम म्हणजे पर्यायी विधायक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न असून बालकांसह अनेक विचारवंत, कलावंत यांना विचारपीठ देणे गरजेचे असते.या उपक्रमात अनेकांना सन्मान दिला जातो.ही अतिशय स्तुत्य बाब असून ज्ञानाची पेरणी करणार्‍या ह्या कार्यक्रमात माझा राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, हा माझा एकट्याचा सन्मान नाही तर आंबेडकरवादी मिशन आणि समाजासाठी त्याग करणार्‍यां व्यक्तिचा सन्मान असल्याचे सांगितले
यावेळी शिवश्री- कामाजी पवार, डॉ. साईनाथ शेटोड, बाबुराव केंद्रे, प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, उध्दव पाटील बैस, रमेश पवार, मुख्याध्यापक- अविनाश बामणे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक- डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले. मानपत्राचे वाचन सोनू दरेगावकर यांनी केले. प्रास्ताविक- प्रदीप शिंदे यांनी केले. आभार माजी सरपंच- देवीदास भोपाळे यांनी मानले.
या कार्यक्रमास विनायक आमनवाड, प्रा.जितेंद्र पवार, बाळासाहेब पांडे, पत्रकार मुखेडकर, किशनराव वाकोरे, बालाजी सोमनकर,शरीफ शेख, शेख सादिक, संजय मुदळे, व्यंकटेश बैस, रवी सोळंके, भीमराव लांडगे, पिंटू सोनमनकर, बळीराम यलमिटवार, अशोकराव शिंदे, सज्जन हुबांड, रामराव शिंदे, आनंदा शिंदे, मनोहर शिंदे, संभाजी शिंदे, रामदास शिंदे, दादाराव शिंदे, देवीदास शिंदे, किशन शिंदे, बळी शिंदे, उत्तम शिंदे, केशव शिंदे, बाबुराव कानगुले, संभाजी रामशेटवाड, केरबा भोपाळे गोविंद गजलवाड, संतोष साळुंके , दिगंबर भोपाळे, रमेश भोपाळे, हनुमंत शिंदे, शिवराज शिंदे, जीवराज शिंदे, योगेश भोपाळे, नागेश भोपाळे आदींसह परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.