प्रतिष्ठा न्यूज

नेहरूनगर व निमनी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमानी साजरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : नेहरूनगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती आण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने मोठया उत्साहात पार पडली. सकाळी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या व ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य यांच्या उपस्थितीत फोटो पूजन करण्यात आले.तसेच निमणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोटो पूजन करण्यात आले.यावेळी जयंतीच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले.  जि प शाळा नेहरूनगर,निमणी, पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी येथील ४५० शालेय मुलांची मोफत आरोग्य तपासणी व रक्त गट तपासणी केली. यावेळी निमणीच्या सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके, मुख्याध्यापक पी डी गुरव,निमनी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील,नेहरूनगरचे मुख्याध्यापक पी जी शिंदे,आदर्श शिक्षक हजारेसर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवा ऊर्फ सुहास कदम,खंडू चौगुले आदि उपस्थित होते.शिक्षक गवळी यांनी रक्तगट तपासणीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.यावेळी चांगला उपक्रम राबविले बाबत शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.त्याचबरोबर नेहरूनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी आणि गावामध्ये मध्ये मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.महापुरूषांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि समाज परिवर्तन घडवण्यासाठी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रसिद्ध व्याख्याते विक्रांत पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.या कार्यक्रमासाठी निमणी गावचे माजी उपसरपंच आर.डी.पाटील (आप्पा), आरोग्य तपासणी साठी डॉ.ऋषिकेश कोळेकर,रक्तगट तपासणी साठी मातोश्री लॅबोरेटरीचे सर्व आरोग्य कर्मचारी तसेच शालेय मुलांना अल्पोपहराची सोय गुरुकृपा केटरर्सचे सर्वेसर्वा संतोष जगदाळे यांनी केली. चंद्रकांत लोंढे,रामदास जाधव यांचेही सर्वांचे सहकार्य लाभले.सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली.यावेळी मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन अनिल सदामते, ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे, प्रमोद भोसले,दिपक देवकुळे,दादासो देवकुळे,अभिजित माने,भारत मोरे,राहुल देवकुळे,रविंद्र वाघमारे, जेसन देवकुळे,सुनिल सदामते,अक्षय वारे आदींनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.