प्रतिष्ठा न्यूज

न्यू इंग्लिश स्कूल बेडग विद्यालयात जागतिक दिव्यांग सन्मान दिवस साजरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : कमतरता किंवा व्यंग हे शरीररचनेत असते. मात्र सक्षम मानसिकतेच्या बळावर अपंगत्वावर मात करता येऊ शकते,अशी कितीतरी उदाहरणे समाजात पाहायला मिळतात.
अशा प्रेरणादायी व्यक्तींची ओळख करून देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आत्मनिर्धाराने टिकवून ठेवण्यासाठी ३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग सहायता दिन म्हणून साजरा केला जातो.
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयात रांगोळी स्पर्धा आणि आनंद मेळावा आयोजित करून दिव्यांग सहायता सप्ताहास प्रारंभ झाला.
यावेळी विद्यालयातील कल्याणी उदय माने,श्रेया दिनकर पाटील, श्रावणी शीतल लिंबीकाई, तृप्ती अनिल कांबळे,सुरज मल्हारी नागरगोजे, कार्तिक आप्पासो मतीवडे,हुजेर युनूस शेख या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
हातामध्ये हात द्या,,,दिव्यांगाना साथ द्या, दिव्यांगाचा सन्मान करा… दिव्यांगांना सहकार्य करा अशा उद्बोधक घोषणांसह दिव्यांग सन्मान रॅली देखील काढण्यात आली.
मिरज पंचायत समितीचे शीतल सुतार सर यांनी विद्यालयास सदिच्छा भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी अशोक माळी, मच्छिंद्र वाघ, सरिता माने,प्रज्ञा कांबळे,अरूणा मस्के , पद्मा कांबळे,उषा ढेबे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.