प्रतिष्ठा न्यूज

स्वामी रामानंद भारती विद्यामंदीरात माजी विद्यार्थी कामगार मंत्री सुरेश (भाऊ) खाडे तसेच व उद्योगपती अशोक (आबा) खाडे यांचा सत्कार संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : स्वामी रामानंद भारती विद्यामंदीर व ज्युनि. कॉलेज तासगांवमध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचे
पालकमंत्री सुरेश (भाऊ) खाडे तसेच त्यांचे
बंधू उद्योगपती अशोक (आबा) खाडे यांचा
सत्कार संपन्न झाला.
या सत्कार प्रसंगी उद्योगपती अशोक (आबा)
खाडे यांनी स्वामी रामानंद भारती विद्यामंदीरातील
वसतिग्रहातील आपला जीवनपट सांगितला. 1970 ते1974 दरम्यान 8 वी ते 11 वी पर्यंतचे शिक्षण स्वामी रामानंद भारती विदयामंदीर मध्ये कसे वसतिगृहांत राहून कसे शिकले याचा उलगडा केला. 1972 च्या दुष्काळ पडल्यानंतर कशी परिस्थिती निर्माण झाली. त्या संकरामधून वसतिग्रहाच्या अधिक्षक देसाई सर यांनी कशी मदत केली हे नमूद केले.
घरची आर्थिक परिस्थिती नसताना आई-वडीलांचे
मार्गदर्शन व शिक्षकांच्या मार्गदनाद्वारे जीवनात पुढे जात राहिलो. एका कंपनीत काम करत असताना 1992 मध्ये राजीनामा देऊन स्वतः कंपनी स्थापन करून भारतामध्ये DAS या स्वतःच्या कंपनीद्वारे स्वतः एक एक प्रगतशील उद्योगपती म्हणून नावारूपास आलेले आहेत.
आपल्या भाषणात शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश
दिला कोणतेही काम शिका, त्यामध्ये कमीपणा मानू
नका व निष्ठेने ते काम पूर्ण करा यश तुमचेच आहे.
कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा मा.
श्री. सुरेश (भाऊ) खाडे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांनी त्यांच्या 1972 ते 1975 स्वामी
रामानंद भारती विद्यामंदीर व ज्युनि. कॉलेज तासगांव
मधील वसतिग्रहातील विदयार्थी जीवन स्पष्ट केले.
आज सुध्दा विद्यार्थी जीवनामध्ये त्यांच्यावर झालेले संस्कार, समाजामध्ये काम करताना विसरले नाहीत. ज्या मातीमध्ये घडलो त्या मातीला आम्ही कधीच
विसरणार नाही. विद्यार्थी जीवनामध्ये वसतिगृहातील जीवनाचा उल्लेख करताना कशा गमतीजमती
करायचे याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले
की, मला वसतिग्रहाचे आचारी व अधिक्षक कसे जेवायला द्यायचे. 1975 नंतर ते मुंबईला आपल्या भावाच्या बरोबर एका कंपनीत काम करीत होते. 1993 पर्यंत त्या कंपनीमध्ये त्यांनी काम केले, आणि
थोरले बंधू मी दत्तात्रय खाडे याच्या शब्दाला मान देऊन त्यांनी DAS नावाची कंपनी स्थापन केली. ती मोठी केली. हे करत असताना थोरले बंधूनी सांगितल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जत या मतदार संघातून प्रथमच त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आमदार झाले. शेवटी ते म्हणतात.
एका कामगाराचा आमदार होतो, आमदाराचा कामगार मंत्री होतो हे सर्व आई वडिलांचे व गुरुजनांचे आर्शिवाद यामुळे आम्ही घडलो.


या प्रसंगी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय (काका) पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री. अविनाश (काका) पाटील, सांगली विभागप्रमुख, आजीव सेवक प्राचार्य डॉ. श्री मिलिंद हुजरे, माणिकराव जाधव, माजी उपाध्यक्ष, वसंतदादा शेतकरी साखर कारखाना. सांगली, बाळासाहेब पाटील-संगालक वसते शिक्षण संस्था, निमणी, दिलीप गोगळेकर, प्राचार्य व्ही. एच. पाटील व संस्थेचे आजी-माजी आजीव सेवक, विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.