प्रतिष्ठा न्यूज

युवकांना स्वयं प्रेरणा देण्यासाठी सदैव तत्पर असणारे विभाग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना – प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : ग्रामीण टेक्नीकल अँन्ड मँनेजमेंट कँम्पस व ग्रामीण विज्ञान ( व्या.) महाविद्यालय , नांदेड यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात
राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दि.17 ते 23 फेब्रुवारी पर्यंत विशेष वार्षिक शिबीर आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा महाविद्यालयाचा आत्मा असतो . युवक या विभागाच्या जडणघडणीतून स्वयंसेवक तयार होतो . स्वयं प्रेरणा देण्यासाठी सदैव तत्पर असणारे विभाग म्हणजे रासेयो आहे . राष्ट्राच्या उभारणीमध्ये जबाबदार घटक म्हणजे युवक आहे . हा युवक सदैव जागरूक असायला हवा आहे असे विचार कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रस्तुत महाविद्यालयातील डी.एम.एल.टी.विभागाच्या डॉ. सौ.दिपाली धोत्रे पाटील , प्रमुख मार्गदर्शक मुखेडच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे , उमरीच्या कै.बापुसाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. नवनाथ अडकिणे व विश्वजात हाँस्पीटलचे डॉ. ईरशाद शेख तसेच व्यासपीठावर रासेयो विभागीय समन्वयक तथा कार्यक्रमाधिकारी प्रा.यशवंतराव मोखेडे आणि कार्यक्रमाधिकारी प्रा.डी.डी.इंगोले यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.यशवंत मोखेडे सूत्रसंचालन स्वयंसेवक विनायक शिखरे व आभार प्रदर्शन स्वयंसेवक व्यंकटेश पांडे यांनी केले .
डॉ. अडकिणे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती , वाटचाल , कार्यप्रणाली विशद करत असताना रासेयो च्या माध्यमातून युवकामधील होणारे बदल , सामाजिक दायित्व सांगितले .अनेक उदाहरणे देत जीवनातील वास्तववादी विचाराबरोबरच महात्मा गांधी , फुले , शाहू ,आंबेडकर यांच्या आचार – विचारावर प्रकाश टाकले . डॉ. शेख यांनी आयुर्वेद हा मानवी जीवनात किती महत्त्वाचा आहे . समाज निरोगी करण्यासाठी आयुर्वेदातील विविध औषधींचा वापर कसा करावा , गुळवेल , आक्रोड , बदाम , गुळ , मध या सारख्या अनेक आपल्या आसपास असणाऱ्या वनस्पती व वस्तूंचा अंगीकार जीवनात करावे असे विचार मांडले .डॉ. एकलारे यांनी तरूणातील होणारे बदल , ध्येय , धोरण , यशाला गाठण्याची क्षमता सांगितले . राष्ट्रीय धोरण निश्चित करताना युवकांचा देश म्हणून शासनाकडून अनेक योजना , जबाबदारी पार पाडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते . त्याचाच एक भाग म्हणजे रासेयो कडून राबविले जाणारे अनेक उपक्रम आहेत असे विचार व्यक्त केले .
अध्यक्षीय भाषणात डॉ. धोत्रे पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रत्येक वेळी नवनवीन प्रयोग करून सामाजिक कार्य करीत असल्याने अभिनंदन केले . आयुष्यात आयुर्वेद खुप महत्त्वाचे आहे . समाजात कोरोना सारख्या भयंकर महामारीवर आपण अनेक आयुर्वेदिक औषधे वापरून रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढविले . युवक हा शरीराने व मनाने निरोगी असावा असे विचार सांगत अध्यक्षीय समारोप केले . यावेळी प्रा.पुजा दवणे , प्रा.श्रावंती लखपत्री तसेच दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी , स्वयंसेवक , स्वयंसेविका यांची उपस्थिती लक्षणीय होती .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.