प्रतिष्ठा न्यूज

भारतीय जनता युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्षाद्वारे मुख्यमंत्री सहायथा निधी मधून रुग्णास मदत

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : भाजप नेते मोहन वनखंडे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व श्री दिगंबर जाधव श्री सागर वनखंडे श्री महेश चिंनिंटी यांच्या प्रमुख पाठपुराव्याने भारतीय जनता युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून श्री प्रकाश बनसोडे या रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायथा निधी मधून 1 लाख रु अर्थसहाय्य मंजुर करून देण्यात आले.
विजय नगर येथील श्री प्रकाश बनसोडे यांच्यावर खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.
सदर शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च अपेक्षित होता.
भारतीय जनता युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री महेश चिंनिंटी यांनी सदर रुग्णास धिर देत सदर रुग्णास मुख्यमंत्री सहायथा निधी मधून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.
आज सदर मंजुर झालेले मदत बनसोडे यांना सुपूर्त करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री दिगंबर दादा जाधव राज्य सचिव श्री सागर दादा वनखंडे राज्य सचिव श्री विकास दादा मोरे कक्ष प्रमुख श्री महेश चिंनिटी श्री मयुर मोहिते सुवंदीत काळे उपस्तित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.