प्रतिष्ठा न्यूज

एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षांचा १००℅ निकाल न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूरच्या ११२ विद्यार्थ्यीनींचे नेत्रदीपक यश

प्रतिष्ठा न्यूज
मलकापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट या चित्रकला ग्रेड परीक्षांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूर (ता. शाहूवाडी ) विद्यालयातील ११२ विद्यार्थ्यीनींचे नेत्रदीपक यश…विद्यालयाचा १००℅ निकाल. कलाशिक्षक, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्हीही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यीनींनी उत्कृष्ट यश संपादन केले असून ‘इंटरमिजीएट’ या ग्रेड परीक्षेच्या १००% निकालाची हॅट्ट्रिक झाली आहे. यावर्षी या परीक्षेला २६ विद्यार्थ्यीनी बसलेल्या होत्या त्यापैकी १२ विद्यार्थ्यीनींनी ‘ए’ ग्रेड, आणि १२ विद्यार्थ्यीनींनी ‘बी’ ग्रेड प्राप्त केले, तर २ विद्यार्थ्यीनींना ‘सी’ ग्रेड मिळाली आहे.
वैष्णवी दादासो माने, तन्वी राजाराम कामेरकर,श्रावणी विनायक कुंभार, सानिका विश्वास वागवेकर, मोनिका अरुण शेलार, वैष्णवी महेश कामेरकर, हर्षदा दिपक वळवी, गायत्री आनंदा सुतार, जान्हवी नामदेव पालवे, तनिषा प्रकाश पाटील, श्रावणी रामहरी सलगर, सबिहा बालेखान जमादार या सर्व विद्यार्थ्यीनींनी ‘ए’ ग्रेड प्राप्त केली आहे, तर वैष्णवी रमेश पाटील, कार्तिकी किरण कुंभार, शारदा रविंद्र जोशी, रुपाली दगडू शिंदे, वेदिका अरविंद यादव, अनुष्का अशोक जामदार, मनिषा बधाराम परमार, संध्या कृष्णात बरगे, तनुजा बाबूराव शिंदे, पूनम कोंडीबा पिंगळे, जब्बीन जावेद जमादार, स्नेहल संदिप चाळके या सर्वांनी ‘बी’ ग्रेड प्राप्त केली आहे. भक्ती रमेश पडवळ, मालती लक्ष्मण धोत्रे या ‘सी’ ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यीनींना सन २०२२/२३ या चालू शैक्षणिक वर्षात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये ए ग्रेडसाठी ७ गुण,
बी ग्रेडसाठी ५ गुण, तर सी ग्रेडसाठी 3 वाढीव गुणांचा लाभ होणार आहे.
एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेला ८६ विद्यार्थीनी बसलेल्या होत्या. त्यापैकी ५ विद्यार्थीनी ए ग्रेड, आणि ४८ विद्यार्थीनी बी ग्रेड तर ३३ विद्यार्थीनी सी ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना पुढील वर्षी इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षा देता येणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.