प्रतिष्ठा न्यूज

चौधरवाडी प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न चर्चासत्रात शिक्षक बंधू -भगिनीनी साधला संवाद

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : चौधरवाडी ता . गगनबावडा येथील प्राथमिक शाळेत केंद्रशाळा शेळोशी अंतर्गत पाचवी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख गजानन कांबळे होते .
यावेळी  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन अध्यापिका सौ. सरीता देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी विद्यार्थीनीची निवड झाल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक मनोज गुरव यांचा सत्कार करण्यात आला .
द्वितीय सत्रात शिक्षण परिषदेत  राजेंद्र कागले, प्रमोद पाटील यांनी ” निपुण भारत ” या विषयावर केंद्रातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. दिवसभर झालेल्या चर्चासत्रात शिक्षक बंधू – भगिनीनी आपला सहभाग नोंदवला.
शाळेच्या वतीने केंद्रातील उल्लेखनीय कामगिरी कामगिरी करणाऱ्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक  डी. एस. पाटील यांनी केले. त्यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या शालेय कामकाजाचा थोडक्यात
आढावा घेतला . सुत्रसंचालन  रामेश्वर विभुते यांनी केले. तर आभार संजय देसाई  यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.यावेळी केंद्रप्रमुख गजानन कांबळे,एस बी तेली, संजय देसाई ,  दिलीप हराळे , आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.