प्रतिष्ठा न्यूज

न्यू इंग्लिश स्कूल,बेडगची श्रद्धा माळी नवोदयला पात्र

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ ,नवी दिल्ली व्दारा घेतल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रद्धा प्रमोद माळी ही सांगली जिल्ह्यातून ओ.बी.सी. मुलींमधून पात्र ठरली आहे.
ग्रामीण भागातील बुद्धीमान,प्रतिभासंपन्न विद्यार्थी काळासोबत बदलणा-या शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहावेत यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी या पात्रता परीक्षांचे आयोजन केले जाते.
प्रत्येक जिल्ह्यातून पात्र विद्यार्थी निवडून त्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. राहण्या – जेवणाची सोय,गणवेश, शैक्षणिक साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू हे सारं मोफत पुरवलं जातं.
विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार न करता त्यांच्या गुणात्मक उत्कर्षासाठी सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची रूजवणूक, पर्यावरण विषयक जाणिव जागृती,साहसी मोहीमा यशस्वी करण्यासाठीचे कौशल्य,कला-क्रिडा नैपुण्य या सर्वांगीण विकासाच्या क्षमता वाढविण्यावर भर दिला जातो. स्पर्धात्मक अभ्यासक्रम राबविले जातात. यादृष्टीने श्रद्धा प्रमोद माळी हिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे.तिच्या कडून प्रेरणा घेऊन अन्य विद्यार्थ्यांनी देखील अशा वेगळ्या वाटा धु़ंडाळाव्यात ; असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक अँथोनी डिसोझा यांनी केले.
श्रद्धा माळी हिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला ; याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पर्यवेक्षिका उज्वला ढेरे, जेष्ठ उपशिक्षक सुरेंद्र गायकवाड,हणमंत म्हेत्रे, अनिकेत घस्ते, उपशिक्षिका सरिता माने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.