प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाणे उत्तुंग यश

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंब्रिज आयआयटी मेडिकल अकॅडमी मधील शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्र पाटील, कॅम्पस को ऑडिनेटर डॉ. सतीश पाटील यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शिक्षकांचे ही अभिनंदन केले.

12 वी बोर्ड परीक्षेत यश मिळवून न थांबता जेईई आणि नीट तसेच सीईटी परीक्षेमध्ये सुद्धा उत्तुंग यश मिळवून पालकांचे आणि अकॅडमीचे नाव अधिकाधिक उंचीवर घेवून जाण्याचे काम येथील शिक्षक करत आहेत. बोर्ड परीक्षेमध्ये कु. अथर्व सुनील खैरमोडे , कु. हर्षराज संजयकुमार वैनगडे, कु. अनुष्का चंद्रशेखर काशीद, कु. राजकन्या उद्धवराव डफळे, कु. केतन राजविजय पाटील या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन करत अकॅडमीचे शिक्षक, प्रशासन व्यवस्था यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सांगली, मिरज परिसरातील अत्यंत चांगली शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृह व्यवस्था असणारी व नावारूपाला आलेली ही एकमेव संस्था आहे. मुलांच्या हितासाठी संस्थेने मोठे काम केले आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये अग्रेसर अशी गुलाबराव पाटील शिक्षण संस्था आहे.
अकॅडमीचे डायरेक्टर प्रा. हरिकृष्णा सर, आदिनारायण सर, देव राव सर, मुरली कृष्णा सर, स्मिता कुंभार मॅडम, इम्रान् नदाफ, प्राजक्ता पवार, पियुषा आवटी, अकॅडमीचे प्रशासक प्रा. रफिक तांबोळी सर या सर्वांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.