प्रतिष्ठा न्यूज

शासकीय रुग्णालय परिसरात रुग्ण हक्क सनदचे अनावरण..

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली:- महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट नियम 2021 मधील तरतुदीनुसार रुग्णांच्या हिताकरिता सर्व हॉस्पिटलच्या दर्शनी भागात रुग्ण हक्काची सनद लावणे, पंधरा प्रकारचे उपचाराचे दर पत्रक लावणे, तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर लावणे. याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आरोग्य हक्क समिती व मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने पद्मश्री वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरातील दर्शनी भागात रुग्ण हक्काच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत अहंकारी यांच्या हस्ते फीत कापून व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या हस्ते पॉकेट रुग्णहक्क सनदचे प्रकाशन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अहंकारी म्हणाले “महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट’ याविषयी आम्ही अनभिज्ञ असून, त्याची संपूर्ण माहिती घेऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपचारातील हलगर्जीपणा, रुग्णांशि गैरवर्तन, नियमबाह्य ज्यादा बिल, अपेक्षित सेवा नाकारणे, याबाबत. रुग्ण, सामाजिक संस्था, रुग्णालय प्रशासन, यांच्या समन्वयातून आपण वाटचाल करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्य हक्क समिती( जन आरोग्य अभियान) लोकसहभाग लोक पुढाकारातून करीत असलेल्या रुग्णांच्या कायदेशीर जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. स्वागत प्रास्ताविक आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख यांनी केले. यावेळी राजेश साळुंखे, रमजान खलिफा, हाफिज सद्दाम, इलियास शेख, योगेश रोकडे, शब्बीर कलेगार, समाजसेवा अधीक्षक खाडे , सखी वन स्टॉप सेंटरचे सुरेखा शेख सह  बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.