प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात तालुक्यातील पहिल्या फार्मसी कॉलेजला मान्यता

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सतीश देसाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयास महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची नुकतीच मान्यता प्राप्त झाली.यामुळे गगनबावडा तालुक्यातील पहिले फार्मसी व व्यावसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय  सुरू करण्याचा मान आनंदी शिक्षण प्रसारक मंडळास अध्यक्ष प्रा.सतिश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाला.
सतिश देसाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयामूळे गगनबावड्यासारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना डी.फार्मसी सारखा व्यवसायिक अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून उपलब्ध होत आहे.  या कोर्सेसच्या मान्यतेकरिता संस्थापक अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई व प्राचार्य डॉ.आर एस आडनाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कोर्सेसचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा. सतिश देसाई यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.