प्रतिष्ठा न्यूज

शासन व प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे जतचा विकास खुंटला : आमदार विक्रम सावंत; सांगलीत रंगला आपुलकीचा कट्टा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वातंत्र्यापासून दुष्काळाचे चटके सोसणारा सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असलेला तालुका जत. या तालुक्याला दुष्काळी भाग म्हणून आज ही कलंक लागलेला आहे. अलीकडल्या कालावधीत म्हैशाळ योजनेतून 7000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र उर्वरित भाग अजूनही दुष्काळाने होरपळत आहे. 126 महसूल विभाग व 115 ग्रामपंचायती असणारा हा तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून मागासलेला आहे.
प्रशासन व शासन यांच्यातील समन्वय नसल्यामुळे आजही जत तालुका विकासापासून वंचित आहे. कर्नाटक राज्यातून 29 हजार हेक्टर भाग ओनिताखाली आलेला आहे. यामुळे थोडी पाणी पातळी उंचावलेली आहे.या भागात डाळिंब, द्राक्ष कमी पाण्यात उत्पन्न देणाऱ्या पिकांची शेती केली जाते. अलीकडच्या काळामध्ये दोन कारखाने, दूध डेरी सोडली तर इतर व्यवसाय आलेले नाहीत. अशी माहिती आपुलकीच्या कट्ट्यावर बोलत असताना आमदार विक्रम सावंत यांनी दिली .ते पुढे म्हणाले माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक योजना सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. काही योजना आज पटलावरती आहेत. वैयक्तिक लाभाच्या त्यामध्ये मागेल त्याला शेततळे देण्याची काम केले. काही पिकांचा शासनाच्या फळबाग योजनेत समाविष्ट करून घेण्यात यश आले. या पुढील काळात जनसामान्यांसाठी अनेक योजना राबवणार आहे. जत मतदार संघाचा कायापालट हाच माझा अजिंठा असणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठीमागे आहोत. याचे कारण राजकारण आहे. सत्ता नसताना विकास फारसा होत नाही. म्हणावं तेवढा निधी उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना याची सर्व जाणीव असते. पण ते काम करण्याच्या मनस्थिती नसतात. त्यांचा व शासनाच्या प्रतिनिधीत्व करणाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे म्हणावा तेवढा विकास होत नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले. त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. यावेळी तात्यासाहेब खोत, श्रीकांत पाटील, पांडुरंग शिंदे, प्रकाश मालपाणी, अर्जुन चव्हाण, संतोष भुतेकर, सुलोचना पवार,भारती पाटील,भीमराव कुंभार, एकनाथ नलवडे, खुजगावकर, विजया दाभोळे, विजयमला कदम , बी बी साठे, सी जी टेके, एन पी पाटील, प्रकाश पाटील, सुरेश बुटेव परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.