प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- पत्रकार शिवराज पवार यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :-  लोहा तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी प्रेस संपादक तथा पत्रकार शिवराज पवार यांची सर्वानुमते चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.
शिवराज पवार यांची लोहा तालुकाध्यक्ष म्हणून सन 2020-21 पासून उत्कृष्ट काम करत असल्याने त्यांची तीन वर्षांची कार्यपद्धती पाहता चौथ्या वर्षाचीही जबाबदारी त्यांच्या वर देण्यासाठी त्यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.
या निवडीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष- डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार राज्य सल्लागार- प्राचार्य डॉ.वसंत बिरादार, मराठवाडा संघटक- बापु गायकर यांच्या सहकार्याने व नांदेड जिल्हाध्यक्ष- संजीवकुमार गायकवाड यांनी शिवराज पवार यांची चौथ्यांदा लोहा तालुकाध्यक्षपदी निवड केली.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष- डी.टी. आंबेगावे, संघटक- बापू गायकर, राज्य सल्लागार- प्राचार्य डॉ.वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष- संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष- भारत सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष- साहेबराव सोनकांबळे, वसंत सिरसाट यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.