प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांनी स्विकारला पक्षाचा एबी फॉर्म

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज पक्षाकडून अधिकृतरीत्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी लागणारा एबी फॉर्म स्विकारला.
भाजपाचे क्लस्टर प्रमुख आमदार प्रशांत परिचारकपरिचारक, आमदार सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते एबी फॉर्म संजयकाका पाटील यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, म्हाडा जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर, महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे- पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.