प्रतिष्ठा न्यूज

भुईबावडा घाट अवजड वाहतुकीस खुला करा अन्यथा प्रशासनाला जाब विचाणार

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : सध्या  आंबा, काजू बागायत दारांसाठी महत्वाचा सिजन आहे. अशा मध्ये हा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्या मुळे या बागायतदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  कारण हा एकच घाटमार्ग खारेपाटण परिसरातून  वाहतूक होते. त्यांना भुईबावडा हा जवळचा  मार्ग आहे.
करूळ घाटमार्ग दुरुस्ती साठी बंद केल्यामुळे अवजड वाहनांना फोंडाघाट मार्गे वाहतूक करावी लागत आहे. यात ७० किलोमीटर चा नाहक भुर्दंड वाहन चालकांना पडतो. त्यामुळे ही वाहतूक भुईभावडा घाट मार्गे च चालू रहावी. तसेच ६ चाकी वाहनांना त्यात मुभा द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.
अन्यथा युवासेना प्रशासनाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असा इशारा  नाईक यांनी दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.