प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूल सी.बी.एस.ई मिरज मध्ये अनय संदीप कुलकर्णी याचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : केंब्रिज स्कूल सी .बी.एस.ई मिरज मधील इयत्ता-पहिली मधील विद्यार्थी अनय संदीप कुलकर्णी याने २७ जानेवारी २०२३ रोजी पणजी गोवा येथे झालेल्या नॅशनल अबॅकस परीक्षे मध्ये तृतीय क्रमांक मिळवत परीक्षा पूर्ण केली. या परीक्षे  करीता ६ राज्यातून एकूण ६०० मुलांनी सहभाग घेतला होता. याच बरोबर तो इंटरनॅशनल पातळी वर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. हि परीक्षा मलेशिया येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच या सत्कार समारंभा वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ख्रिस्तीना मार्टिन मॅडम , उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर मॅडम, समन्वयक अश्विनी येलकर मॅडम , तसेच क्रीडा शिक्षक चंद्रशेखर सर व राजेश सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.