प्रतिष्ठा न्यूज

बारूळ ता.कंधार महादेव यात्रेनिमित्त धार्मिक,सांस्कृतिक,आरोग्य शिबीर,प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात प्रसिध्द असलेले बारूळ येथील जागृत देवस्थान श्री महादेव मंदिर असून येथे दरवर्षी बारशी निमित्त यात्रा भरत असते व बाहेरगावाहून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात तसेच यात्रे निमित्त येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात . दरवर्षी प्रमाणे यावर्षी बारुळ येथील यात्रे निमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी येथे यात्रेकरुंसाठी ठेवण्यात आली असून सदरील यात्रेला दि १एप्रिल पासून सुरुवात होत आहे दि १एप्रिल शनिवारी महादेव काठीची स्थापना व काठीचे लग्न, दि २ फेब्रुवारी रात्री ८वाजता सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचा विनोदातून प्रबोधनाचा कार्यक्रम,३ एप्रिल सोमवारी रात्री ८ वाजता महेंद्र बनसोडे प्रस्तुत सिनेस्टार शिफा पुणेकर यांचा “कैरी मी पाडाची” लावण्यांचा सदाबहार कार्यक्रम, दि ४ एप्रिल मंगळवारी सिनेस्टार मृणाल कुलकर्णी प्रस्तुत भाग्यश्री प्रोडक्शन सोलापूर यांचा “लावन्यखणी” लावणीचा कार्यक्रम,तर दि ५ एप्रिल बुधवारी कुस्त्यांची दंगल सोबतच दि १ते ५ पर्यंत डॉ योगेश दुलेवाड वैद्यकीय अधिकारी प्रा अ केंद्र बारूळ व त्यांच्या सहकार्यांमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून गरजुनी सदरील शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.तसेच टेनिस बॉल क्रिकेट चे खुले सामने आयोजित करण्यात आले असून सदरील कार्यक्रमांचा यात्रे करू,भाविक भक्त व व्यापाऱ्यांनी लाभ घावा व कार्यक्रमांची आणि यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन महादेव मंदिर संस्थान व ग्रामास्थामार्फत करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.