प्रतिष्ठा न्यूज

ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांना साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज
भिलवडी प्रतिनिधी : भिलवडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सुभाष कवडे यांना साने गुरुजी संस्कार साधना पुणे या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते व ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. दिलीप गरुड यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.प्रारंभी खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.
भिलवडीचे साने गुरुजी संस्कार केंद्र छोट्याशा पणतीप्रमाणे देश घडविण्याचे कार्य करीत आहे. देश घडविण्यासाठी आज साने गुरुजींच्या संस्काराची गरज असून भिलवडी चे सामाजिक कार्यकर्ते सुभाष कवडे हे समाज घडविण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.
यावेळी बोलताना सुभाष कवडे म्हणाले की,गेल्या २५ वर्षांत सार्वजनिक वाचनालय भिलवडी व साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी या माध्यमातून उत्तम माणूस घडवण्याचा व मुलांमध्ये वाचन संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. मला मिळालेला पुरस्कार हा आईने दिलेली शाबासकी आहे. आज समाजात असंवेदनशीलता व जातीयता वाढते आहे अशा वेळी गुरुजींची श्यामची आई घरोघरी पोहोचविण्याचे काम पू ज्य साने गुरूजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून सातत्याने करीत राहणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बी. आर. माडगूळकर, सुहास पानसे, डॉ. अलका पुराणिक डॉ.दिलीप पुराणिक, अरुणा हिंगणे,स्मिता परदेशी, प्रा.डॉक्टर शरद जावडेकर, मनोहर कोलते, जीवन इंगळे,दिलीप काशीद,डॉ.यशोदा वाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे सचिव बी. आर. माडगूळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.ॲडव्होकेट संतोष मस्के यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता चव्हाण यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.