प्रतिष्ठा न्यूज

विरोधकांची त्रेधा उडाली असून आपण जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : संजयकाका पाटील यांचे कवठेमहांकाळ येथे भावनिक आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
कवठेमहांकाळ प्रतिनिधी : विरोधकांची त्रेधा उडाली असून लोकसभेच्या निवडणुकीत आपण जिंकणार आहोत हे निश्चित आहे पण जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे भावनिक आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ येथे मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
यावेळी भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, योगेश पाचड,युवानेते प्रभाकर पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रमोद शेंडगे, नितीन पाटील, सुमित कुलकर्णी,  जिल्हा समानवक मिलिंद कोरे, आजम माकानदार, तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन आमोणे, रमेश खोत, नगरसेवक रणजित घाडगे, अजित माने, ईश्वर व्हनकडे, अजय पाटील, महावीर माने, दयानंद सगरे, व्यकंट पाटील, नामदेव भोसले, जलाल शेकडो, शिवराज भोसले, बंटी भोसले, महवदेव सूर्यवंशी, संजय घागरे, प्रवीण पवार, शिवदास भोसले यांच्यासह कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थितीत होते.
संजयकाका पाटील म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने दोनवेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणाने जनसेवेसाठी वापरण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे. अनेक लोक आपल्या जवळ येत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या उपक्रमाला या जिल्हयातून ज्यांनी शक्ती दिली, ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्या मंडळींच कौतुक आपल्याला केलं पाहिजे. कवठेमहांकाळ तालुक्यात ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी आपण दोन हजार ९२ कोटी रूपये आणले. पंतप्रधानांना भेटलो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी मिळाला. कवठेमहांकाळ व जत तालुक्यात बंदीस्त पाईपलाईनद्वारे योजना पूर्ण करू शकलो. जिल्ह्यातून चार ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग नेले. अनेक विकास कामे केली. लोकांच्या आशिर्वादाने तिसऱ्यांदा संधी मिळणार आहे. विरोधकांच काय चालले ते आपण पहातोय. जिंकणार आहोत. जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे आणि इतर तालुक्यातून मतदान व्हावे यासाठी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.