प्रतिष्ठा न्यूज

खाडे स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संवेदनशील नागरिक घडविण्याचे कार्य कौतुकास्पद : प्रा. शरद बनसोडे

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे उन्हाळी शिबीराचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे शरद बनसोडे (संचालक – शारीरिक शिक्षण शिवाजी विद्यापीठ) व बापूजी साळुंखे महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक आकाश बनसोडे उपस्थित होते. यांनी मुलांना शिक्षण व खेळ याची सांगड घालत यशस्वी कसे होता येते? याविषयी मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी संस्थेविषयी बोलताना, “खाडे स्कूलमध्ये आदर्श विद्यार्थ्यांबरोबरच संवेदनशील नागरिक घडवण्याचे काम होते आहे”. तसेच या संस्थेतून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होत आहेत याचे श्रेय मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे व मुख्याध्यापिका संगीता पाटील यांना जाते असे सांगितले.
        विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व मोबाईलपासून मुले दूर जावीत या दुहेरी हेतूने उन्हाळी शिबिराची सुरवात केली असल्याचे खाडे यांनी सांगितले. तसेच मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी शिक्षकांच्या मदतीने उन्हाळी शिबिराचे नियोजन अत्यंत चोख केले आहे. या शिबिरामध्ये मुलांना घोडेस्वारी, नेमबाजी, कॉम्प्युटर डिझायनिंग व फन गेम, आर्ट अँड क्राफ्ट, ताईकांदो, डान्स, योगा इत्यादी खेळ व उपक्रम घेतले जाणार आहेत. याचा कालावधी १७ एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत रोज सकाळी ०८:०० ते दुपारी ०१:०० पर्यंत असणार आहे. या शिबिरास मिरज व आजूबाजूच्या परिसरातून मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
         या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुजाता सूर्यवंशी व  प्रास्ताविक ईराप्पा कोळी यांनी केले. यावेळी संस्थेचे शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.