प्रतिष्ठा न्यूज

लिंबगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.आरतीताई कदम यांची निवड : गावात आनंदोत्सव

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या मोठे असलेले व जिल्हा परिषद सर्कलचे गाव असलेल्या लिंबगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड दि 7 डिसेंबर 2022 रोज बुधवारी पार पडली असुन सरपंचपदी सौ.आरतीताई अनिलराव कदम यांची निवड मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी निवडंगे, ग्रामविकास अधिकारी टाकणवाले, यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव घनगे यांच्या पत्नी सौ.रेखा धनगे या सरपंच होत्या त्यांनी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिलराव कदम यांच्या पत्नी सौ.आरतीताई कदम यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.
या निवडीसाठी भिमराव पवार, नांदेड पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळराव कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडीनंतर उपसरपंच विश्वास कदम, प्रतापराव कदम, कमलबाई कदम, रेखा घनगे, सखुबाई डाढाळे, कोमल शितळे, चंद्रकलाबाई भुसावले, नूरखां पठाण, गजानन पोहरे, अंबुबाई कदम, यांनी नुतन सरपंच सौ.कदम यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिक वामनराव कदम, सतीश कदम, व्यंकटराव कदम, मनोहर डाढाळे, गोविंद कदम, सुनील भुसावळे, भालेराव, कृष्णा कदम, राजाराम सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, अनिल धनगे, सय्यद हबीब, रमेश वाडेकर, अनिल बालाजी, शेख पाशा, प्रकाश भुसावळे, गजानन लोखंडे, राजू लोखंडे, संतोष गायकवाड, राहुल नरवाडे, चिंतामण पोहरे, राहुल कदम, रोहन कदम, अक्षय कदम,आदींची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.