प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

संभाजी ब्रिगेडच्या नवीन पदाधिकारी निवडी जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : युवराज शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदाखाली आणि नियुक्त करण्यात आल्या. त्यावेळी ते म्हणाले आपण एका विचारधारेशी निगडित आहोत. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. म्हणूनच तुमची निवड करण्यात येत आहे. या कामातून तुम्हाला समाधान मिळत असेल तरच तुम्ही ते काम निष्ठेने व काळजीपूर्वक पार पाडाल अशी मला अपेक्षा आहे. पद महत्त्वाचं नसून आपण त्या पदाला काम करून महत्त्व देऊया,आपल्यावर मी जी जबाबदारी देत आहे. ती आपण सामर्थ्य पणे सांभाळाल असा मला विश्वास आहे‌. एकमेकांची जिरवा जिरवी, पाडापाडी जातीयता, धर्मभेद आणि स्वार्थासाठी पदाचा उपयोग करून व्यक्ती केंद्र राजकारण करू नका. समाज डोळ्यासमोर ठेवून तळागाळातील सामान्यांना उपयोगाचे समाजकारण करावे. तर तुम्ही एक दिवस मोठे व्हाल. आपल्या सर्वांना पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा.
यापुढे आपण सर्वजण एकत्रपणे सांगली जिल्ह्यामध्ये काम करून संभाजी ब्रिगेडची वेगळी ओळख निर्माण करूया.. पुढील प्रमाणे निवडीची पत्र देण्यात आली.
शिवाजी नारायण जाधव (जिल्हा उपाध्यक्ष)

संदीप पवार (जिल्हा वाहतूक अध्यक्ष )

आसिफ भोकरे (जिल्हा वाहतूक उपाध्यक्ष)

राजेंद्र जाधव (मिरज तालुका उपाध्यक्ष)

नंदकुमार बगाडे (मिरज तालुका वाहतूक अध्यक्ष)

फिरोज जामदार (सांगली जिल्हा वाहतूक सचिव )

अजय बंडगर (मिरज शहर वाहतूक अध्यक्ष )

सागर खांडेकर (मालगाव शहर वाहतूक अध्यक्ष )

रंजनीकांत पात्रुड (जिल्हा वाहतूक संघटक)

पवन कदम (सांगली जिल्हा प्रवक्ते)

प्रशांत सूर्यवंशी (शेतकरी आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष)

फक्रुद्दीन भालदार (जिल्हा सचिव)

जितेंद्र भोसले (जिल्हा संघटक)
रेखाताई पाटील (जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.