प्रतिष्ठा न्यूज

उमरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी स्वप्नील पाटील उमरेकर यांची बिनविरोध निवड

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 18 सप्टेंबर 2022 रोजी होऊन 19 सप्टेंबर रोजी निकाल लागला. 14 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच व 13 सदस्य एकाच गटाचे निवडून आले होते.
त्यात सरपंच म्हणून साईनाथ पवार हे विजयी झाले, तर उपसरपंच पदाची निवड आज दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी पीठासीन अधिकारी मा . चोरमले साहेब, ग्रामसेविका स्वप्नजा चव्हाण व सर्व नवनिर्वार्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत स्वप्निल (बंटी) पाटील उमरेकर यांची एकमताने उपसरपंच म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य – सचिन सिरसाट, आशा सिरसाट, कैकशा शेख, रूक्‍मीनबाई जाधव, सतीश राठोड, सुनील सोनटक्के, रामचंद्र राठोड, सरजाबाई पवार, संतोष चव्हाण, तातेराव पवार, शश्याबाई पवार, तसेच गावातील नागोराव पाटील माली, एन डी सिरसाट, सतीश पाटील, मधुकर सिरसाट, प्रकाश सिरसाट, गणपत पवार, उस्मान शेख, राजेश सिरसाट, श्रीनिवास सिरसाट, मारोती पवळे, मोबीन शेख, आदींची उपस्थित होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.