प्रतिष्ठा न्यूज

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आवश्यकता असेल तरच करावा : पोलिस उपनिरीक्षक थोरवे

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड दि.30 : शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर आवश्यकता असेल तरच काळजीपूर्वक करावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश नारायणराव थोरवे यांनी केले.ते राजर्षी शाहू विद्यालय व ज्यूनियर काॅलेज आणि भडके काॅम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सेक्युरिटी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.एम.हंगरगे हे होते.
पुढे बोलतांना श्री थोरवे म्हणाले की, सध्या चे युग हे मोबाईल,इंटरनेट चे आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर कमीत कमी करुन अभ्यासात सातत्य ठेवावे. विविध क्षेत्रात करियर करून देशसेवा करावी. तसेच पालकांनी , आई वडिलांनी सुद्धा आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस निरीक्षक श्री प्रकाश थोरवे यांनी इंटरनेट आणि मोबाईल वापराचे फायदे,तोटे सांगितले. त्यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी भडके काॅम्प्युटर चे संचालक श्री सुनील भडके,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत, सहशिक्षक श्री रत्नाकर कोत्तापल्ले , पो.काॅ.काशीनाथ कारखेडे ,श्री मुकेश सर, श्री अखिल सर आदीजण उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.