प्रतिष्ठा न्यूज

तासगावात दुचाकी चोरी प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मोटर सायकल चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला तासगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख पंचावन्न हजार किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.पत्रकार सुजित खोत राजापूर,प्रवीण अनिल कांबळे,साहिल सोमनाथ कांबळे राहणार विसापूर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत अधीक माहिती अशी कीं सांगली जिल्हयातील मोटर सायकल चोरीच्या गुहयांबाबत पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी आढावा बैठकिमध्ये सदरचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिला होता.सदर आदेशाप्रमाणे आश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस नीरीक्षक भानुदास निंभोरे यांनी गुन्हे प्रकटिकरण पथकास त्याप्रमाणे कारवाई बाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे दि 3 रोजी तासगाव डीबी पथकाकडील पोहेकॉ अमित परीट,पोहेकॉ अमोल चव्हाण,पोना  सोमनाथ गुंडे,पोशि समीर आवळे,पोशि सतिश खोत,असे मा.पोलीस निरीक्षक निंभोरे यांनी तासगाव शहरात घडणा-या मोटर सायकल चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करणेबाबत दिलेल्या तोंडी आदेशाप्रमाणे पेट्रोलिंग करीत फिरत असताना खास बातमी दारामार्फत त्यांना बातमी मिळाली कि,बेंद्री चौक येथे सुजित खोत हा पत्रकार एक चेरी रंगाची बुलेट गाडी घेवुन थांबलेला असुन सदरची मोटर सायकल हि चोरीची आहे अशी बातमी मिळालेने सदर डीबी पथकाने बेंद्री चौक येथे जावून खात्री केली असता सुजित खोत हा त्याचे कब्जातील बुलेट मोटर सायकल नंबर MH 10 CG 6060 हि घेवुन थांबलेला दिसला,त्याचेकडे त्याचे कब्जातील बुलेट मोटर सायकलचे कागदपत्राबाबत चौकशी करता तो काही एक समधानकारक हकिकत न सांगता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला.त्यामुळे त्याने सदरची मोटर सायकल हि कोठुन तरी चोरुन आणल्याची सदर पथकाची खात्री झालेने त्यांनी त्यास त्याचे कब्जातील बुलेट मोटर सायकलसह चौकशी कामी ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरची मोटर सायकल हि सुमारे १० महिन्यापुर्वी पलुस येथुन चोरुन आणल्याची कबुली दिली.सदरबाबत खात्री केली असता पलुस पोलीस ठाणेस गु.र.नं. ६०/ २०२२ भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजल्याने त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने तसेच त्याचे साथीदार मिळुन मोटर सायकल चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे केले असुन त्यांचेकडुन एकुण २,५५,०००/- रू किंमतीच्या हिरो एच एफ डिलक्स,रॉयल इनफिल्ड बुलेट, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस,हिरो स्प्लेंडर प्लस, होंडा ड्रिम युगा मोटर सायकल अशा एकुण ५ मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.याबाबतचा पुढील तपास पोहेकॉ अमित परीट करीत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.