प्रतिष्ठा न्यूज

सांगली ग्रंथोत्सव 2023 चे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 8 : वाचाल तर वाचाल, जो वाचन करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. सुख, दु:खात ग्रंथ नेहमी आपल्या सोबत असतात. ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. 8 व 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुना स्टेशन चौक, सांगली येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मंत्री, कामगार तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, ज्येष्ठ साहित्यीक डॉ. राजेंद्र माने, अप्पर तहसिलदार अश्विनी वरूडे, सहायक ग्रंथालय संचालक पुणे शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते ग्रंथपूजनाने झाला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासह इतर महापुरूषांचे चरित्र वाचल्याने मोठमोठ्या संकटावर मात करण्याची ताकद मिळते. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन कटिबध्द आहे. मराठी भाषेसाठीही शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. यासाठी मराठी भाषा विद्यापिठाची निर्मिती केली आहे. पुस्तक हा आपला साथी बनवा, एकाकीपण कधीच येणार नाही. वृध्दपकाळही सुखाचा होईल. वाचन आणि संगिताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल. पुस्तकाची, वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळते. ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलधारकांनी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये पुस्तके द्यावीत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ साहित्यीक डॉ. राजेंद्र माने म्हणाले, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी साहित्यीकांसह इतर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक ग्रंथालय संचालय शालिनी इंगोले यांनी ग्रंथोत्सवाची पार्श्वभूमी व महत्व विशद केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक सहायक आवजी गलांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, वाचक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.