प्रतिष्ठा न्यूज

यावेळी सांगलीचे आमदार, खासदार मराठा स्वराज्य संघ ठरवणार : महादेव (बापू) साळुंखे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा स्वराज्य संघाच्या वतीने प्रसाद गार्डन,डी मार्ट,जवळ, सांगली येथे बैठक पार पडली. या वेळेला सांगली, मिरज, कुपवाडच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. या वेळेला राज्याध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळेला सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते माननीय प्रभाकर उर्फ अण्णा शंकरराव कुरळपकर यांची सांगली जिल्हा संपर्कप्रमुख निवड करण्यात आली,सुनील दळवी यांची सांगली शहर उपाध्यक्ष, राजेश साळुंखे यांची सावळी गाव प्रमुख,संतोष दाणेकर यांची मिरज शहर अध्यक्ष, आकाश माने यांची माधव नगर गाव प्रमुख,प्रशांत पवार यांची कुपवाड शहर उपाध्यक्ष, अरुण चव्हाण यांची सांगली शहर अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले तसेच जत तालुका सरपंच संघटनेचेअध्यक्ष पदी डफळापूरचे सरपंच व मराठा स्वराज्य संघाचे माजी जिल्हाध्यक्ष यांची निवड झाल्याबद्दल मा.सुभाषराव गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळेला राज्याध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की आमचे सरकार आल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांना भेटून मराठा आरक्षण दिले जाईल कारण 50 टक्केचे आरक्षणाचे मर्यादा
वाढवून मराठाआरक्षण मिळणे शक्य आहे.त्यासाठी सनातानी, देश विकणारे, जातीयवादी सरकार बदलले पाहिजे व आता सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आमची वाढलेली ताकद बघून सांगली जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील आमदार,खासदार कोण होणार हे आता मराठा स्वराज्य संघाच ठरवणार तसेच मागील काळामध्ये मराठा स्वराज्य संघाला विचारात न घेतल्यामुळे सांगलीमध्ये देश विकणारे,सना तानी पक्षाचा खासदार, आमदार निवडून आले. पुढील काळात कोणाला आमदार, खासदार करायचे हा काळ मराठा स्वराज्य संघाच ठरवेल असे हे सांगितले .पुढील काळात आम्ही ठरवल तोच खासदारां,आमदार निवडून आणू अशी ग्वाही या वेळेला जमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समोर दिली या वेळेला मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष मा. एड. रणधीर कदम, राज्य प्रवक्ते संतोष पाटील,आर बी पाटील, संघटक रमेश शिंदे सरकार, राज्य प्रवक्ते वसंतराव चव्हाण, जिल्हा प्रवक्ते पंडितराव बोराडे, शहराध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण सरकार , पी आर पाटील, गोपाळ पाटील,सतीश पाटील, डॉक्टर महेश भोसले,पंडित पाटील,सतीश जाधव, सागर साळुंखे, प्रशांत डांगे, प्रमोद लाड शरद पवार, सोमनाथ आप्पा घाडगे, राजेश साळुंखे , धर्मेंद्र आबा कोळी, सिद्धू घाडगे, अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्तेउपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.