प्रतिष्ठा न्यूज

आशा धनाले, त्रिशला शहा यांना ‘प्रा. प. रा. आर्डे कार्यकर्ता प्रेरणा’ पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि विज्ञानवादी लेखक ‘प्रा. प. रा. आर्डे यांच्या १४ ऑक्टोबर २०२३ या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिवादन सभा उत्सव हॉल, माधवनगर-कुपवाड रोड, शालिनीनगर (यशवंतनगर), सांगली येथे सकाळी 10 वा. आयोजित केली आहे. याप्रसंगी आर्डे कुटुंबियांकडून ‘प्रा. प. रा. आर्डे कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार’ सुरू करण्यात येत आहे. हा पहिला पुरस्कार अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले आणि त्रिशला शहा (मिरज) यांना देण्यात येत आहे. प्रत्येकी रु.५०००, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुकुमार मंडपे (सातारा) यांच्या हस्ते आणि प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान कार्यक्रम होईल. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अंनिस आणि आर्डे कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.