प्रतिष्ठा न्यूज

जागतिक योगा दिनाच्या कार्यक्रमात कामगार मंत्री सुरेश खाडेनी केला योगा: नव महाराष्ट्र हायस्कूलच्या पटांगणावर शासकीय योगा महोत्सव संपन्न : हजारो योग प्रेमिंची उपस्थिती

प्रतिष्ठा न्यूज
कुपवाड प्रतिनिधी : जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो आणि तसेच पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच सेवा सुशासन आणि गरीब कल्याण यांच्या मार्फत आज योग महोत्सव संपन्न झाला. सकाळी 6 वाजता कुपवाड लक्ष्मी मंदिर येथील नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या पटांगणावर
आयोजित योग महोत्सवात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी उपस्थिती लावत योगा केला. यावेळी आयोजित योगा प्रात्यक्षिकामध्ये 1 हजारहून अधिकानी सहभाग घेतला.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मनपा आयुक्त सुनील पवार, सभागृह नेत्या भारती दिगडे , भाजपाचे प्रदेश सरचिटणीस शेखर इनामदार , उपायुक्त राहुल रोकडे, क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, केंद्रीय संचार ब्युरोचे महेश चोपडा, नगरसेवक विनायक सिंहासने, सुबराव मद्रासी, मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ.रवींद्र ताटे, मनपाचे क्रीडाधिकारी महेश पाटील, नगरअभियंता परमेश्वर अलकुडे, भगवान पांडव आदींची उपस्थिती होती. प्रारंभी महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांच्या देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर पतंजलीच्या राज्य संवाद प्रभारी अनिता जोशी यांनी सर्वांना योगाचे प्रकार, महत्त्व सांगत उभे आणि बैठे योगा प्रकारचे सादरीकरण करीत सर्वांकडून ते करवून घेतले. यावेळी बोलताना कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला आपल्या शरीराकडे पाहायला वेळ नाही. त्यामूळे प्रत्येकाने दररोज 15 मिनिटे आपल्या शरीरासाठी दिल्यास आपण आरोग्य संपन्न जीवन जगू शकतो असे सांगत दैनंदिन योगा प्रत्येकाने करावा असे आवाहन केले. संपूर्ण योगा महोत्सवाचे आयोजन पतंजलीच्या राज्य संवाद प्रभारी अनिता जोशी, स्नेहल कुलकर्णी, माजी जिल्हा प्रभारी प्रियांका साळुंखे, पतंजली संरक्षक श्रीनाथ दांडेकर, कलाप्पा माळी, शोभा बने, प्रसाद डूबल, अरुण मालवणकर, स्मिता अनघळ आदीनी केले. आभार जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यानी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.