प्रतिष्ठा न्यूज

रमेश पाटील यांनी मिळवला सातव्यांदा आंतरराष्ट्रीय एम डी आर टी (USA)चा पुरस्कार

कोलंबिया, कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा :  गगनबावडा तालुक्यातील सांगशी या छोट्या खेड्यातील एल आय सी चे विमा प्रतिनिधी रमेश नारायण पाटील यांनी विनम्रता, जिद्द, चिकाटीचे जोरावर एल आय सी चा व्यवसाय करत सलग सातव्यांदा एल आय सी चा  एम डी आर टी (USA) हा आंतरराष्ट्रीय  सर्वोच्च बहुमान मिळवला.  व त्यांची कोलंबिया, कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे.यानिमित्त ९४९ एलआयसी  शाखेतर्फे वरिष्ठ शाखा अधिकारी शुभदा बिंदगे, उपशाखा अधिकारी तानाजी पवार, विजय जोशी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आत्तापर्यंत हजारो कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याचे काम त्यांनी केले आहे.अनेक कुटुंबांचे स्वप्न पूर्ण व्हावे त्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू असते.
क्षेत्र कोणतीही असो प्रयत्नवादी माणसाला यश नक्कीच मिळते. याचे उदाहरण म्हणजे रमेश पाटील यांनी आपल्या २१वर्षाच्या वाटचालीतून दाखवून दिले. आज ते चेअरमन ऑफ क्लब मेंबर म्हणून कार्यरत आहेत. अनेक वेळा परिस्थिती पुढे माणसे झुकताना पाहतो. पण विनम्रता, जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा, माणसं जोडण्याचा स्वभाव यासारख्या गुणामुळे परिस्थितीलाच हात टेकायला लावणारे एलआयसी प्रतिनिधी म्हणजे रमेश पाटील आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.