प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस इंग्लिश स्कुलमध्ये बाल संसद शपथविधी समारंभ उत्साहात साजरा.

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम.टी.ई.एस इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची बाल संसद शपथविधी समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी मतदान घेऊन निवड करण्यात आली . मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतर मत मोजणी करून अंतिम निकाल घोषित करण्यात आला. विजयी उमेदवारांचा शपथविधी व पद्ग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजीव कोरे ब्राईट फ्युचर इंग्लिश स्कुल चे उपप्राचार्य बाळकृष्ण पाटील उपस्थित होते.  त्यांनी बाल संसदेचे महत्व व कार्य सांगून विजयी उमेदवाराचे कौतुक केले. या बाल संसदेचे विजयी उमेदवार या प्रमाणे पंतप्रधान रुद्राक्ष बजरंग चौगुले,
सांस्कृतिक मंत्री रावी गुरुप्रसाद प्रभु केळूस्कर,
क्रीडा मंत्री दक्षा सतिश नाईक, दळणवळण मंत्री जुहेब जमीर शेख, पर्यटन मंत्री विरेन अश्विनी कलगावे, आरोग्य व स्वच्छता मंत्री कृष्णा कुशल राक्षे शिक्षण मंत्री अमोघ विजय माळी,ऊर्जा मंत्री आदित्य अमित बोरगावे,
      या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख , उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव सुरेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आपल्या पाल्याचे कौतुक करण्यासाठी सर्व पालकवर्ग उपस्थित होता. या बाल संसद कार्यक्रमाचे नियोजन अर्चना वाळवेकर व अतुल जाधव यांनी केले.  तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका अवंती कोरे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.