प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यातील वेसरफ धरण भरले

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुका परिसरात   सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात तब्बल १७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कुंभी धरण क्षेत्रात १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज सकाळी ५.३० वाजता गगनबावडा तालुक्यातील वेसरफ ल.पा. तलाव १००% भरला आहे. सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरून १२५ क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असलेने याठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी असल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभाग  यांनी कळवले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.