प्रतिष्ठा न्यूज

1000 रुपयाने बेरोजगारांना प्लॉट उपलब्ध करून द्या काँग्रेसच्या महादेव पाटलांचे आव्हान : तर आम्ही निवडणुकीतुन माघार घेऊ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : साळसूदपणाचा आव आणून नियमाप्रमाणे प्लॉट घेतल्याचे राष्ट्रवादीने सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र सत्तेचा गैरवापर करून अवघ्या हजार रुपये एवढ्या कवडीमोल दराने प्लॉट घेतल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार महादेव पाटील यांनी आज केला.तासगाव तालुक्यातील बेरोजगारांची राष्ट्रवादीला खरोखर काळजी असेल तर हजार रुपये दराने व्यवसायासाठी बेरोजगार तरुणांना प्लॉट उपलब्ध करून द्यावेत आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ असे खुले आव्हान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी राष्ट्रवादीला दिले.महादेव पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, राष्ट्रवादीचे रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुरेश पाटील व रोहित पाटील यांनी बाजार समिती च्याकडून नियमाने प्लॉट भाड्याने घेतल्याचा दावा केला होता.महादेव पाटील यांनी या दाव्याची खिल्ली उडवली ते म्हणाले वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेती मालाच्या शेतीपूरक व्यवसायासाठी जागा घेणे आवश्यक आहे.मात्र शेती व्यवसायाच्या नावाखाली बाजार समितीची इमारत रोहित पाटील यांनी घेतली,मात्र त्यात राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याचबरोबर हे कार्यालय रोहित पाटील यांना हस्तांतरित करण्यापूर्वी बाजार समितीच्या साडेआठ लाख रुपयांच्या खर्चाने या कार्याचे नूतनीकरण फर्निचर बनवण्यात आले.आता राष्ट्रवादीचे कार्यालय वापरत असलेले फर्निचर ते नसेल तर बाजार समितीने खर्च केलेले साडेआठ लाख रुपये कुठे गेले याचा खुलासा मग बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी करावा.त्याचबरोबर तासगाव शहरातील सर्वात मोक्याची असणारी जागा अवघ्या एक हजार रुपये भाड्याने सुरेश पाटील यांनी घेतली आहे.तासगाव शहरात जागांचे भाड्यांचे दर सगळ्यात तालुक्याला माहिती आहेत दहा बाय दहाच्या गाळा सुद्धा 15 ते 20 हजार रुपयांच्या भाड्याशिवाय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे यांनी मात्र एक हजार रुपयात पाऊण गुंठे जागा मिळवली आहे. तासगाव शहरातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे राष्ट्रवादीने कितीही कांगावा केला तरी सत्य आता लोकांसमोर आले आहे.एक तर राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील सर्व बेरोजगारांना एक हजार रुपये दराने व्यवसायासाठी प्लॉट जागावाटप करावेत किंवा या दोन्ही जागा चुलत्या पुतण्यांनी जनतेची माफी मागून परत कराव्यात असे महादेव पाटील म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.