प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकातील काही उताऱ्यांचे वाचन प्रथम वर्ष बी.कॉमची विद्यार्थ्यांनी कु. प्राची पोळ हिने केले. तसेच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथालय विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एन व्ही शहा व सरपंच सौ. मानसी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सतीश देसाई, प्रा. डॉ.विद्या देसाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन व्ही शहा होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. एस. कांबळे यांनी केले तर आभार प्रा. व्ही. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचालन प्रा.डॉ. एस.एस. पानारी यांनी केले. यावेळी गुरुनाथ कांबळे, प्रा. डी.के. पाटील, प्रा.एच. एस. फरास, प्रा.एस. एस. घाटगे, प्रा. आर. आर. सरनोबत आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.