प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय,ज्यूनियर काॅलेज मध्ये स्व.वाडेकर जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.15 : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय, ज्युनियर काॅलेज, राजर्षी शाहू बालक मंदिर, कस्तुरबा गांधी विद्यालयात मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.जनार्दनराव गणपतराव वाडेकर यांची जयंती दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी उत्साहाने साजरी करण्यात आली.
स्व.जनार्दनराव वाडेकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे संचालक श्री चंद्रशेखर सोनवणे, प्राचार्य श्री बी.एम.हंगरगे, उपप्राचार्य डॉ.पाडूरंग यमलवाड, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांनी पुष्पहार अर्पण केले. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
तसेच दि.15 ऑक्टोबर रोजी मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ” वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात आला. मिसाईल मॅन डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस प्राचार्य श्री.हंगरगे, मु अ. श्री बी. डी. देशमुख, श्री अशोकराव गळेगावे यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी उपस्थित कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त हजारो विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे वाचन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे ग्रंथपाल श्री सोनाजी वाडेकर, प्रा डॉ.तुकाराम जाधव, प्रा.श्री तिवडे, प्रा. आर. डी. देशमुख, जाधव, श्री एन. पी. केद्रे, श्री आनंद मोरे, क्रिडाशिक्षक, श्री टी. एन. रामनबैनवाड, श्री शिवानंद टापरे, श्री अमोल भंगाळे, श्री व्ही. एम. पोकलेवाड, श्री बालाजी कदम,श्री व्ही.बी.भोसले,श्री आर.एच.कदम, श्री रत्नाकर कोत्तापल्ले, डाॅ. माणीक गाडेकर, श्रीमती जायेभाये, श्रीमती पावसे,श्रीमती खुळे, श्रीमती एस.आर.बायस , श्रीमती एस.पी.पोहरे,श्रीमती ए.वाय.देगलूरकर, श्रीमती गीरी , श्रीमती एल.एम.जाधव, श्रीमती एल.एच.वानोळे, श्रीमती एम.एच. घोडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.