प्रतिष्ठा न्यूज

परशुराम विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आज डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस देशभर अनेक उपक्रमाने साजरा करण्यात येत आला .यादिनाचे औचित्य साधून गगनबावडा येथील परशुराम विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. ”
वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग तीन तास ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले.
“आकाश कंदिल निर्मिती “हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 150 आकाश कंदिल बनविले.
हा दिन वृत्तपत्र विक्रेता म्हणूनही साजरा केला जातो. विद्यालयातील एका विद्यार्थ्याने गगनबावडा गावातील ग्रामस्थांना वर्तमानपत्र वाटप करून डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली.
या सर्व उपक्रमासाठी प्राचार्य गोसावी, गिरी बुवा, सुरेश थोरात, कुंडलिक जाधव, दीपक पाटील, स्वाती चौगले, जनार्दन देशमुख, सोनम गवस स्नेहल कुंभार या सर्वांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.