प्रतिष्ठा न्यूज

हिंगणीच्या प्राथमिक शाळेत डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : माहूर तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आज दि 15 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात येऊन साजरी करण्यात आली.
 प्रथम डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेत शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर लाळे, शिक्षक व उपस्थित पालक यांचे हस्ते करण्यात आले.
यानंतर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून का साजरा  करण्यात येतो व त्यांच्या जीवनचरित्रा वर मुख्याध्यापक लाळे,व वाचन करणे का आवश्यक आहे या वर कानवटे सर यांनी मार्गदर्शन केले. व ग्रंथाचे पूजन करून हिंगणी गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
त्यानंतर “हाता धुवा कार्यक्रम” हा उपक्रम घेण्यात आला.अस्वच्छ हाताचे परिणाम याची माहिती देण्यात आली. हात कसे स्वच्छ धुण्यात यावेत ? याचे प्रात्यक्षिक श्री पाटील सर यांनी करवून दाखवून विद्यार्थ्यांकडून स्वतः प्रात्यक्षिक घेतले.
यावेळी शाळेतील गुरमुळे सर, होळगे सर, पाटील सर, कोनाळे सर, शिंदे सर, कदम सर, पालक व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.