प्रतिष्ठा न्यूज

शेतकऱ्यांसाठी खुश खबर ई पीक पाहणीस 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालया मार्फत 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण राज्यात करण्यात येत आहे. सध्या खरीप हंगाम 2022 हंगामाची ई पीक पहाणीची कार्यावाही सूरु आहे. खरीप हंगाम 2022 च्या पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक पाहणी चे 2.0.3 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. आता पर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅप वर आपली नोंदणी केली आहे.

खरीप हंगाम 2022 ची ई पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2022 हि अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती. तथापि राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतक-यांना अदयापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन मा. जमाबंदी आयुक्त सो. पुणे यांचे मान्यतेने मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई- पिक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी सर्व शेतकरी बंधूना अवाहन करण्यात येते की त्यांनी आपली खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी या वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत मोबाईल अॅप द्वारे ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावे असे आवाहन – श्रीरंग तांबे- उप जिल्हाजिकारी व राज्यसमन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय. पुणे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.