प्रतिष्ठा न्यूज

खाडे इंग्लिश स्कूलमध्ये बहुविध विकास कौशल्य उपक्रम म्हणजे काळानुरूप टाकलेलं पाहूल – प्रा. डॉ. उदय दबडे

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : येथील दास बहुउद्दशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथे विश्वकर्मा दिन व अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. उदय दबडे यांनी या दिनाविषयी व अभियंता कारकिर्दीविषयी मार्गदर्शन केले. खाडे इंग्लिश स्कूलमध्ये बहुविध विकास कौशल्य उपक्रम म्हणजे काळानुरूप टाकलेलं पाहूल असेही प्रोत्साहन उद्गार काढले. खाडे स्कूल मुलांच्या शिक्षणाबरोबरच देत असलेल्या अनेकविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. आज मुलांना शिक्षणासोबतच एखादी जीवनोपयोगी कला शिकवणे गरजेचे असल्याचे सांगितले. खाडे स्कूल त्याचप्रमाणे विद्यार्थी घडवत असल्याने संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता खाडे, समन्वयक ज्योत्स्ना माने, प्रा विशाल देंडे, दिपाली खैरमोडे, नदाफ सर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच या उपक्रमास संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.