प्रतिष्ठा न्यूज

स्वातंत्र्य चळवळीतील संघटक गोदनबाई गायकवाड यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
बानूरगड प्रतिनिधी : गोदनबाई बाबुराव गायकवाड यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले .
पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा सत्कार करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते . वसंतदादा पाटील यांच्या चळवळीत त्यांनी आपले योगदान दिले होते . स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे संघटन करण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता . व्यसनमुक्तीसाठी त्यांनी दिलेला लढा महत्त्वाचा आहे . शैक्षणिक कार्यासाठी त्यांची धडपड मोठी होती . त्यांची सर्व नातवंडे उच्चशिक्षित व उच्चपदस्थ आहेत . डॉ .स्वाती शिंदे – पवार, प्रा .डॉ . प्रीती शिंदे -पाटील, श्री .प्रवीणकुमार शिंदे सर, सौ .सीमा इंगवले,श्री . प्रशांत शिंदे सर, सौ .साधना पवार, सौ .शुभांगी शिंदे, श्री .निलेश गायकवाड, श्री . फत्तेसिंह गायकवाड, सौ .माधुरी जाधव यांच्या त्या आजी होत्या . त्यांच्या निधनाने बाणूरगड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
त्यांनी जोडलेला परिवार फार मोठा आहे .
रक्षाविसर्जन रविवार दि .१४ रोजी ठीक स . ८.१५ वा. बाणूरगड येथे आहे . दहावा विधी मंगळवार दि .१६ रोजी स. ठीक ९.oo वा . आहे . कार्य दि . १८ रोजी ठीक दु . १२ .०० वा . आहे .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.