प्रतिष्ठा न्यूज

अंनिसच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ वर चित्रकला स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत मराठा समाज, डॉ. आंबेडकर रोड, सांगली आयोजित केली आहे.
‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई’ च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा १० ते १६ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या चित्रकला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. १०००,व्दितीय पारितोषिक रु. ७०० ,तृतीय पारितोषिक रु ५००, उत्तेजनार्थ रु ३०० ची दोन बक्षिसे आहेत. सर्व विजेत्यांना रु ५०० ची पुस्तके सोबत दिली जातील.
पारितोषिक विजेत्यांची चित्रे सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शनात दोन दिवस मांडली जातील. सर्व सहभागींना आकर्षक गिप्ट, प्रमाणपत्र आणि एक पुस्तक दिले जाईल. चित्र काढण्यासाठी कागद आयोजकांच्या वतीने दिला जाईल तर चित्रकलेचे सर्व साहित्य सहभागींनी घेऊन यायचे आहे.
सर्वांना २५ जानेवारी २०२३ पर्यंत नावनोंदणी डॉ. सविता अक्कोळे- 93714 01312, आशा धनाले – 98604 53599 यांचेकडे करावी. नावनोंदणी केल्यानंतर सर्वांची एकत्र ऑनलाईन मिटींग घेऊन ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयासंबंधी, स्पर्धे संबंधी अधिकमाहिती सांगितली जाईल.
या चित्रकला स्पर्धेसाठी शाळांनी आणि पालंकांनी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने पाठवावे असे आवाहन अंनिस व मराठा समाजाने केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.