प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील स्मृतिदिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. २२ : सौ. संयोगीता पाटील स्मृति दिनानिमित्त गुलाबराव पाटील शिक्षण संकुलात विविध पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल बापू जाधव, स्टेट बोर्डाच्या लुधिया सावणुर, सीबीएसईच्या नाजमीन मुल्ला यांना आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सूर्यकांत घाडगे यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव आणि महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईचे माजी संचालक जे. बी. पाटील, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे एस.बी. तावदारे, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, नूतन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव पाटील व सौ. संयोगीता पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त फोटोंचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

ट्रस्टचे चेअरमन श्री. पृथ्वीराज पाटील यांनी पुरस्कार मिळालेल्या अध्यापकांचे अभिनंदन केले, आणि त्यांच्या कार्याचे महत्व सांगितले. संकुलबद्दल सविस्तर माहिती सांगितली. संस्थेतील शिक्षकांनी यशस्वी परंपरा अखंड चालू ठेवावी असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुणे बाळासाहेब गुरव म्हणाले गुलाबराव पाटील यांनी विविध क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आज ही या क्षेत्रात अजरामर ठरले आहे.
प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे म्हणाले, गुलाबराव पाटील यांचा जीवन प्रवास अभ्यास करण्यासारखा आहे. सहकार आणि सामाजिक क्षेत्रात तसेच राज्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.

यावेळी बापू जाधव म्हणाले, वक्ता आणि श्रोता कसा असावा हे गुलाबराव पाटील हे एक उत्तम उदाहरण आहे. माणसानं कसं जगावं हे गुलाबराव पाटील याच्यांकडून शिकावं.

संयोगीता वहिणींच्या गतकाळच्या जीवनाकडे पाहताना सहज आठवते की, त्यांचं जीवन आगळं, वेगळं तर होतेच शिवाय माणसाची उत्तम पारख, आर्थिक अडचणींना धाऊन येणाऱ्या, सामाजिक संस्कृतीला आदर्श घालून देणाऱ्या अशा व्यक्तिमवाला आमचा प्रणाम आहे. या सन्मानाप्रीत्यर्थ मी संस्थेचा ऋणी आहे.

या कार्यक्रमास कॅम्पस कोऑडीनेटर सतीश पाटील, अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत, मुख्यद्यापिका श्रीदेवी कुल्लोळी,पद्मा सासनूर व सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक वृंद व शिक्षेकतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरिता पाटील मॅडम आणि आभार प्रदर्शन अश्विनी येलकर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.