प्रतिष्ठा न्यूज

तासगावात दीड तप रक्तदान शिबीर ठेऊन जागविल्या जातायत मुलीच्या स्मृती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगांव मध्ये फोटोग्राफर असणारा बाप हा गेली 18 वर्षे झाली श्रद्धाच्या जागवतोय स्मृती.4 जुलै 2008 साली केवळ सतरा महिन्याची असणारी श्रद्धा नावाची चिमुरडी ही अति भयंकर अशा कर्करोग आजाराने देवाज्ञा झाली.त्यांना पहिली एकच मुलगी,काय तीचं कौतुक काय तीचा लाड,अत्यन्त हुशार असणारी श्रद्धा सारखी आजारी असायची म्हणुन सांगलीला नामांकित हॉस्पिटलला दाखवलं.तिची आजाराची लक्षणे बघून डॉ.नी बोर्नम्यॅरो टेस्ट घेतली.मुंबई टाटा कँसरला तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा ग्रहमंत्री स्व.आर आर आबा पाटील यांचे सहकार्यामुळे  तिला टाटाला ऍडमिट केल.डॉक्टरांनी शर्थीचें प्रयत्न केले परंतु त्यातून ती वाचली नाही.तिची आठवण म्हणून संपूर्ण कुटुंबाने आणि गल्लीतील नाट्यझंकार मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबीर ठेऊन स्मृतीदिन साजरा करायचे ठरवलं आज आठरा वर्षे झाली त्या स्मृती सर्वच मित्रानी खऱ्या अर्थाने जागवल्या आहेत.मित्रपरिवार आणि रक्तदाते यांच्यामुळेच मी रक्तदान शिबीर दरवर्षी घेत आहे असं वडिल अजय यांनी यावेळी सांगितले, तसेच समाजातील लोकांना शक्य होइल त्यावेळी रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी श्रद्धाच्या फोटोला पुष्पहार घालून रक्तदान शिबीरला सुरुवात केली 40 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपत श्रद्धाला श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे पाहुणे तासगांव पोलीस स्टेशनचे पि.आय.सोमनाथ वाघ,स्वा. रा भारती विद्या मंदिरचे प्राचार्य  शांताराम पाटील,प्राचार्य व्ही.एच पाटील,अमोल नाना शिंदे रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तसंकलन हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.