प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्हा परिषद येथे शिक्षक संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहाने साजरा

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेडच्या वतीने शिवस्वराज्य दिना निमित्त जिल्हा परिषद नांदेड च्या प्रांगणात फळे वाटप करण्यात आले. या फळे वाटप दालनाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रंसगी उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ठोंबरे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्रा.सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जि.प.च्या आहवानास प्रतीसाद देऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,नांदेडने फळे वाटपाच्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संघटनेचे कौतुक करून अभिनंदन केले. सदरील कार्यक्रमाचे आयोजक अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर व शिक्षण सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर थडके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी गंगाधर मावले, जी. टी. कदम भगवान चव्हाण,रमेश पवार, मंगेश हानवटे,बालाजी कवटीकवार, नांदेड तालुकाध्यक्ष व्ही. व्ही. कल्याणकर,नायगाव तालुकाध्यक्ष सुरेश बाराळे, विश्वनाथ पिंपळे, सुनिल लष्करे, मुत्तेपवारसर,विजय आमटे,बळी राठोड,माधव कल्हाळे,दिगांबर बिरादार आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी अखिल संघटनेचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सभासद बांधव व बहूसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.