प्रतिष्ठा न्यूज

डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ पोस्टकार्ड पाठवून सांगली अंनिसने नोंदविला निषेध

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : नुकताच एनसीईआरटीने दहावी च्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली कडून ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे राज्यव्यापी प्रबोधन अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत सांगली अंनिस शाखेच्या वतीने आज एनसीईआरटी दिल्लीला पोष्टकार्ड पाठवून निषेध नोंदविला आहे. तसेच एनसीईआरटी पुन्हा हा डार्विनचा उत्क्रांती सिध्दांत अभ्यासक्रमात लावावा अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे म्हणाले, डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत भाग अभ्यासक्रमातून वगळून नागरिकांना शिक्षणातून मिळणारी विज्ञानवादी चिकित्सकवृत्ती नष्ट करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. डार्विनचा सिद्धांत जगाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य करतो.

अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की,ज्यांना भोंदूगिरीच्या व धर्माच्या साहाय्याने आपली राजकीय, सामाजिक सत्ता अबाधित ठेवायची आहे. त्यांची दुकाने उत्क्रांतीच्या शिकवणीमुळे बंद पडतील, या भीतीमुळेच डार्विन उत्क्रांतीच्या सिद्धांताला विरोध होत आहे.

याप्रसंगी सांगली शहर अध्यक्ष गीता ठाकर, कार्याध्यक्ष आशा धनाले, सचिव डॉ.सविता अक्कोळे, विज्ञान लेखक जगदीश काबरे, प्रा. अमित ठाकर, चंद्रकांत वंजाळे, त्रिशला शहा, सुहास यरोडकर, सुहास पवार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.