प्रतिष्ठा न्यूज

मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या नाती वांझ होताना या कविता संग्रहाचे पुणे येथे प्रकाशन संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पुणे प्रतिनिधी : संस्कृती प्रकाशन,पुणे यांनी प्रकाशित केलेल्या मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या नाती वांझ होताना या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा  पुणे येथील पत्रकार भवन मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॕ.श्रीपाल सबनीस  यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, ज्येष्ठ कवी व  महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्यवाह उद्धव कानडे, प्रख्यात कवी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रदीप पाटील, सुप्रसिद्ध कवी व डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष वसंत पाटील, ज्येष्ठ लेखक रघुराज मेटकरी प्रा.सर्जेराव पाटील, प्रा.रुपाली अवचरे, कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थिती मध्ये हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी मनीषा रायजादे , दयासागर बन्ने, गझलकार बबन धुमाळ, बालसाहित्यिक संजय ऐलवाड,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य संदीप सांगळे, कवी किसन पवार, लेखक सुरेश आडके, ज्येष्ठ समीक्षक राजेंद्र थोरात, कवयित्री हर्षदा सुंठणकर, निवेदिका स्मिता जडे, लेखक दिनेश फडतरे, कवयित्री ज्योती पाटील, पृथ्वीराज पाटील, सदानंद भोसले, युवराज पाटील, राहुल निकम, मोहन पाटील, दयानंद भोसले, पूनम पाटील, प्राजक्ता थोरात, प्राचार्य जगदाळे , रेखा पाटील , मोहसीन मुल्ला, अमित दळवी, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, आर्या पाटील,संस्कृती परिवार यांसह साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.