प्रतिष्ठा न्यूज

ऊस वाहतूकदारांना दरवाढ देऊन त्यांना कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणावे -पृथ्वीराज पाटील यांची मागणी व आंदोलनाला पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : साखर ऊद्योगात शेतकरी आणि ऊस वाहतूकदार यांचे योगदान मोठे आहे. डिझेल व वाहनाच्या सुट्या भागाच्या किंमती दुपटीने वाढले आहेत. वहान चालकांचे पगार वाढले.परंतु ऊस वहातूक दरात अपेक्षित वाढ झाली नाही.शिवाय मुकादमांकडून आर्थिक फसवणुकीचे वारंवार होणारे प्रकार त्यामुळे ऊस वाहतूकदार पुरता कोलमडून पडला आहे.
महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांचे ऊस वाहतुकीच्या दरात ७०% वाढ व ऊस वाहतूकदारांना कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणणे या प्रमुख मागण्यासह इतर महत्वाच्या अकरा मागण्यांवर गांभीर्याने विचार होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेऊन ऊस वहातूकदार संघटनेचे प्रश्न मांडणार. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. ऊस वहातूकदार संघटनेच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. . असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले.
ऊस वहातूकदार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पाटील व सांगली जिल्हा काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. पृथ्वीराज म्हणाले, ‘ शासन ऊस तोड मजूरी वाढवते.. महागाई भत्ता वाढवते.. त्यामध्ये वाढ ही केलीच पाहिजे. त्याप्रमाणेच ऊस वहातूक दरवाढीचा निर्णय घेऊन शासनाने त्यांना दिलासा देणे न्यायोचित आहे.संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमवेत शासन व जिल्हा प्रशासनाबरोबर बैठकीचे आयोजन करुन सर्व प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.