प्रतिष्ठा न्यूज

बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास मोडून काढण्याचे षडयंत्र हाणून पाडू : डॉ. भारत पाटणकर; ७ वे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन तासगाव येथे उत्साहात : राज्यभरातील साहित्यिकांचा सहभाग

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार

तासगाव/प्रतिनिधी : बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास मोडीत काढण्याचे षडयंत्र काही विघातक शक्तींनी चालविले असून ते महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांना एकत्र करून हाणून पाडू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. प्रतिष्ठा फौंडेशनच्या ७ व्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. भारती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते जितेशभैय्या कदम यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीपकाका पाटील होते. तासगाव येथील समृध्दी मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या या समेलनात राज्यभरातील साहित्यिकांनी उत्सफूर्त सहभाग घेतला.
प्रतिष्ठा साहित्य संमेलनच्या उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव गुरव, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, उद्योजक प्रकाश औताडे, युवा नेते राजीव मोरे, कवि संमेलनाच्या अध्यक्षा सौ. मनिषा पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष संमेलनाचे निमंत्रक तानाजीराजे जाधव यांनी केले. विक्रांत पाटील व सुनिता पाटील यांनी सुत्रसंचलन केले. संमेलनाचे निमंत्रक प्रा. जी. के. पाटील यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले. प्रतिष्ठा जाधव, फौंडेशनच्या सचिव विद्या जाधव, उपाध्यक्ष हरीभाऊ पडळकर, सदस्य आनंदकाका पाटील यांनी संयोजन केले.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, सध्या महाराष्ट्रात बहुजनांचा इतिहास पुसण्याचे प्रयत्न जातीयवादी शक्तींकडून सुरू आहे. अगदी छत्रपती शिवरायांच्या बदनामीपासून विविध पातळीवर बहुजनांच्या अस्मितांना उद्ध्वस्त करण्याचा घाणेरडा उद्योग ही मंडळी करत आहेत. याला सत्ताधार्‍यांचा पाठींबा मिळत आहे. श्रमण संस्कृती नष्ट करून मोठ मोठ्या उद्योजकांना देश विकला जात आहे. लोकांच्या मूळ प्रश्‍नांपासून बगल देऊन वास्तवा पूसन दूर नेत धर्मांधता वाढविण्यात येत आहे. इतिसाहाच्या पाना पानांमध्ये हस्तक्षेप करून बहुजनांना गुलामीत ढकलले जात आहे. महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांना एकत्र करून हे षडयंत्र हाणून पाडले जाईल. लोकांना पुन्हा एकदा बहुजनांचा खरा इतिहास सांगण्यासाठी साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. अन्यथा पिढ्यान् पिढ्या वाट्याला आलेली गुलामी आपण कधीच संपवू शकणार नाही. ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माणसाच्या जगण्याचा प्रश्‍न साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मांडला पाहिजे. साहित्यिकांनी वास्तवाला भिडले पाहिजे.
उद्घाटक जितेशभैय्या कदम म्हणाले, ग्रामीण भागात अशा प्रकारची होणारी साहित्य संमेलने नव्या साहित्यिकांना बळ आणि प्रोत्साहन देणारी आहेत. जे खरं आहे तेच साहित्यिक मांडत असतात. त्यामुळे समाज घडत असतो. समाजाला दिशा मिळत असते. तासगाव तालुक्यात प्रतिष्ठा फौंडेशनने सुरू केलेली परंपरा तासगावकरांनी जपली पाहिजे.
स्वागताध्यक्ष प्रदीप माने पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील साहित्यिक व कलावंतांना या संमेलनामुळे मंच उपलब्ध झाला आहे. स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाचा भाग होता आले ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. साहित्यिक हेच खर्‍या अर्थाने समाजाचे परिवर्तन करत असतात. विचारांनी माणूस प्रगल्भ होतो. त्यासाठीच हे संमेलन महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील प्रथितयश कवयित्री मनिषा पाटील-हारोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसमेंलन मोठ्या उत्साहात पार पडले. राज्यभरातील कविंनी यामध्ये सहभाग घेतला.
ज्येष्ठ विचारवंत प्रा डॉ. बाबूराव गुरव यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार कुलदिप देवकुळे, तानाजीराजे जाधव, संजय माळी व विक्रांत पाटील यांनी घेतली. प्रा. गुरव यांनी दिलखुलासपणे ही मुलाखत दिली. त्यातून त्यांचा जीवनपट आणि गेल्या ६० वर्षातील चळवळींचा इतिहास लोकांसमोर आला.
उद्घाटन सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींचा प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव करण्यात आला. नवनियुक्त ग्रामपंचातय सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.