प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत सर्व पक्ष, सरकारचे होणार अंत्यविधी ३ हजार लोकांना उत्तरकार्याचे जेवण ; सर्व पक्षीय बैठकीच्या ठरावाची होळी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी सांगलीत आंदोलक आक्रमक होत असून आज पर्यंत सत्तेत राहिलेल्या सर्व पक्ष आणि सरकारचे विधिवत अंत्यविधी करण्याचा निर्णय झाला, दि. ४ नोव्हेंबर रोजी सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी केले जाणार आहेत, तर तरुण भारत स्टेडिय येथे उत्तर कार्यनिमित ३ हजार लोकांचे जेवण घातले जाणार आहे.

यावेळी सतीश साखळकर म्हणाले, ” अत्तापर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समाजाची दिशाभूल केलेली आहे, वारंवार वेगवेगळी करणे देऊन आरक्षण देणे टाळले आहे, आता आम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोपनाला पाठींबा देण्यासाठी सर्व पक्ष आणि सरकारचे अंत्यविधी करणार आहोत, यामध्ये दि ४ रोजी दहन, ५ रोजी रक्षा विसर्जन आणि दि ७ रोजी उत्तरकार्य केले जाणार आहे. ”
शंभूराज काटकर म्हणाले, ” राज्यात शांततेत चाललेले आंदोलन काही लोक मुद्दाम हिंसक करून बदनामी करीत आहेत, याला उत्तर म्हणून आम्ही सांगलीकर शांततेत हे आंदोलन करीत आहोत, या उत्तर कार्याला ३ हजार लोकांचे जेवण घालून दुखवटा साजरा करणार आहोत.
यावेळी सतीश साखळक, महेश खराडे, शंभूराज काटकर, अमित लाळगे, डॉ.संजय पाटील, रेखा पाटील, आनंद देसाई, गजानन साळुंखे, विजय पाटील,

सर्व पक्षीय बैठकीच्या ठरावाची होळी
मुंबई येथे बुधवारी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत काही ठराव केले आहेत, यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी चेतावणी देण्याचे काम सर्व राजकीय लोकांनी केले आहे. या ठरावत कोणतेही ठाम अश्वास दिलेले नाही, वास्तविक आज आरक्षणाची घोषणा अपेक्षित होती, मात्र ते झालेले नाही, या ठरावावर सर्व पक्षाच्या नेत्यांच्या सह्या आहे, याचा निषेध म्हणून सांगलीत या ठरावाची होळी करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.